शिरूर
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथे २ जुलै रोजी सायंकाळी एका दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागल्याने दुकानाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात जळीत प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील स्टेप वालपेपर दुकानाचे मालक अमोल ठाकरे सायंकाळच्या सुमारास दुकान बंद करुन घरी गेले असताना रात्रीच्या सुमारास दुकानातून जल व धूर बाहेर पडत असल्याचे नागरिकांना दिसले घटनेची माहिती मिळताच अमोल ठाकरे, पोलीस नाईक प्रताप कांबळे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत अग्निशामक विभागाला बोलावून घेत अग्निशामक व नागरिकांच्या मदतीने आग विजावली मात्र सदर आगीमध्ये दुकानातील साहित्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून याबाबत अमोल भगवान ठाकरे वय ३२ वर्षे रा. चासकमान कॉलनी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात जळीत प्रकरणी नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार अमोल चव्हाण हे करत आहे.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथे दुकानाला लागलेल्या आगीमध्ये दुकानाचे झालेले नुकसान.