जुन्नर उपवनसंरक्षक अमोल सातपुतेंनी घेतली दहिवडी ता .शिरूर येथील मृत बालकाच्या कुटुंबियांची भेट

9 Star News
0
जुन्नर उपवनसंरक्षक अमोल सातपुतेंनी घेतली दहिवडी ता .शिरूर येथील मृत बालकाच्या कुटुंबियांची भेट 
शिरूर 
( प्रतिनिधी ) दहिवडी ता. शिरुर येथील मांजरेवस्ती येथे यश शरद गायकवाड या दहा वर्षीय बालकाचा २१ जून रोजी उसाच्या शेतात मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडालेली असताना बिबट्याचा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात असताना नुकतीच जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी मृताच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.
                    दहिवडी ता. शिरुर येथील मांजरेवस्ती येथे यश गायकवाड हा २१ जून रोजी दुपारच्या सुमारास घराच्या पाठीमागे शौचास गेलेला असताना सायंकाळच्या सुमारास यशचा मृतदेह ऊसाच्या शेतात मिळून आल्याने यशला बिबट्याने ऊसाच्या शेतात नेल्याचे बोलले जाऊ लागले खळबळ उडाली मात्र मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसताना देखील वनविभागाने विशेष खबरदारी घेत सदर परिसरात पिंजरे लावत बिबट्या पकडण्याच्या उपाययोजना सुरु केलेल्या आहेत तर आज जुन्नर वनविभागाचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे, शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप, वनपाल गौरी हिंगणे, गणेश पवार, वनरक्षक प्रमोद पाटील, विशाल चव्हाण, यांच्या उपस्थितीत मृत यशच्या कुटुंबियांची भेट घेत विचारपूस केली, तसेच यावेळी घटना स्थळासह परिसरात लावलेल्या पिंजरे तसेच उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली, दरम्यान मृत बालकाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून अहवाल नंतर मृत्यूचे कारण समोर येईन तसेच सदर परिसरात वनविभागाच्या वतीने आवश्यक सहकार्य केले जाईल असे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले.
फोटो खालील ओळ – दहिवडी ता. शिरुर येथे मृत बालकाच्या कुटुंबियांची भेट घेताना उपवनसंरक्षक अमोल सातपुते व आदी.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!