मोक्यातील सहा महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगाराला मोठया शिताफीने पोलिसांनी अखेर गजाआड केले असून, यामुळे पुणे गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरीचे कौतुक होत आहे.
ऋषीकेश किसन खोड (वय 24 रा पांडवनगर, वडकी, ता हवेली, जि पुणे) सहा महिन्यां पासून मोक्यातील फरार आरोपीला अटक करण्यात आली.
दिनांक १८जुलै रोजी गुन्हे शाखा युनिट 6 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत पाहिजे व फरार आरोपींचा शोध व गुन्हेगार चेकिंग गस्त करीत असताना पोलिस अंमलदार समीर पिलाने यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत मोक्यातील पाहिजे असलेला सराईत ऋषिकेश खोड हा सोनाई हॉटेलसमोर, सासवड रोड येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्टाफसह जावून खात्री केली असता तो आम्हास पाहून पळून जात असता पाठलाग करून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात दिले आहे.
गु र नं 48/2024 भा दं वि कलम 387, 143, 148, 149, 504, 506 सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3(1)(1),3 (2) 3 (4) या गुन्ह्यात ऋषिकेश खोड पोलिसांना हवा होता.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गून्हे शैलेश बलकवडे , पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम , पोलिस हवालदार विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, पोलिस नाईक कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, पोलिस अंमलदार समीर पिलाणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, शेखर काटे, प्रतीक्षा पानसरे यांचे पथकाने केलेली आहे.
