शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती शिरूर या भागातून राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार जात असताना त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी शेकडो रूपयांचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या परंतु सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या रोजी रोटीचा घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व महायुतीच्या नेत्यांनी भ्रशब्द काढला नाही. हे सर्व नेते मूग गिळून गप्प होते. अन्यथा वाढदिवसाची भेट म्हणून कदाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखान्यात निधी दिला असता किंवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले असते.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे व महायुतीचे कार्यकर्ते केवळ राजकारणासाठी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा उपयोग करतात का असा सवाल पडला आहे.
शिरूर तालुक्याची अस्मिता आणि शेतकरी यांच्या जीवनाची संलग्न असणारा रावसाहेब दादा घोडगंगा सहकारी साखर कारखाना मोठ्या अडचणी सापडला आहे. मागील वर्षी या कारखान्याला कर्ज किंवा निधी भेटला नाही म्हणून हा कारखाना गाळप करू शकला नाही. याचा मोठा फटका शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
साखर कारखाना बंद पडल्याचे खापर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार तसेच भाजपा व शिवसेना शिंदे गट हे तीनही आमदार अशोक पवार यांच्यावर फोडत आहे. हे बरोबर ही असू शकेल. घोडगंगा कारखाना निवडणूक वेळेस हेच विरोधी पक्ष घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा अशोक पवार यांच्या ताब्यात गेला तर कारखाना बंद पडेल असे बोलत होते. कारखाना अडचणीत असून तो बंद पडणार असे माहित असतानाही सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक का लढवली हा ही संशोधनाचा विषय आहे.
घोडगंगा सहकारी साखर कारखाना एक वर्षापासून बंद आहे. शिरूर तालुक्यातील सर्वच नेत्यांना शरमेने मान खाली घालावी अशी आहे.
यावर्ष हा कारखाना सुरू झाला नाही तर या कारखान्याचे खत होईल हे सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे . यशवंत सारखी परिस्थिती जवळ घोडगंगा येऊन पोहोचला आहे हे लक्षात ठेवा.
काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने कर्जबाजारी असणाऱ्या साखर कारखान्यांना निधी देऊन हे कारखाने सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहे. परंतु घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी राज्य शासन किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार उदासीन असल्याचे चित्र आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आणि त्यात त्यांचा अहिल्याबाई होळकर नगरला कार्यक्रमा करीता शिरूर मार्गे जात असल्याने शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व महायुतीचे सर्वात घटक पक्षांनी दादांचा वाढदिवसानिमित्त सन्मान केला शुभेच्छा दिल्या. आज अजित दादा पवार यांचा वाढदिवस राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री असणारे अजित पवार यांना जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट व महायुतीच्या नेत्यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी साकडे घातले असते तर कदाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवसाची भेट म्हणून घोडगंगा सहकारी साखर कारखान्यांना निधी दिला असता परंतु शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट व महायुती नेत्यांना घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा म्हणून कुठलेही रस नाही. शेतकऱ्यांच्या उसाबाबत किंवा त्यांच्या अडचणी बाबत कुठलीही अस्था या अगोदरही दिसून आली नाही यापुढेही दिसून येणार नाही. केवळ राजकारण करण्यासाठी त्यांना वेळ आहे. म्हणूनच उपमुख्यमंत्री अजित पवार भेटले परंतु घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करणे बाबत मात्र हे सर्वच नेते आजही मूग गिळून गप्प होते असेच म्हणावे लागेल.