शिरूर ( प्रतिनिधी ) धामारी ता. शिरुर येथील एका शेत जमिनीमध्ये महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या एका कथित महाराजाच्या हस्ते जनावरांची हाडे, नारळ, लिंबू यांसह आदी साहित्यांचे पूजन करतअघोरी कृत्य केल्याची घटना घडली असल्याने एका युवकाने याबाबत शिक्रापूर पोलीस व अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे तक्रार करत अनिष्ठ व अघोरी प्रथा सह जादूटोना प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
धामारी ता. शिरुर येथील तेजस मोहिते यांच्या वडिलोपार्जित जमिनीबाबत सध्या न्यायालयात दावा सुरु असून सदर जमिनीमध्ये नुकतेच पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना पिस्तुलचा धाक दाखवून धमकावणाऱ्या प्रभाकर पांडुरंग भोसले या उद्योजकासह महाराष्ट्रात गाजलेला एक कथित महाराजासह काही इसमांनी प्रवेश करत त्या जमिनीमध्ये जनावरांची हाडे, नारळ, लिंबू यांसह आदी साहित्यांचे पूजन करत करणीचा प्रकार करत अघोरी कृत्य केले आहे, त्यांनतर सदर जागेचा वारसदार असलेल्या युवकाने याबाबत चित्रीकरण करत काही पुराव्यांसह शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज देत तसेच अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे माहिती देऊन उद्योजक प्रभाकर भोसले सह जादूटोणा करणाऱ्या कथित महाराजासह अन्य लोकांवर युवकाने अनिष्ठ व अघोरी प्रथा सह जादूटोना प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
स्वतंत्र चौकट १ –
धामारी येथील घडलेल्या घटनेबाबत मोहिते या युवकाने अर्ज दिलेला असून पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत सदर घटनेची पडताळणी करण्यास सांगितले असून त्यांनतर पुढील कार्यवाही केली जाईल असे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी सांगितले.
स्वतंत्र चौकट २ –
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे या घटनेबाबत तक्रार आलेली असून त्याचे चित्रीकरण पाहिले असता सदर प्रकार हा जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा असून त्यामध्ये जनावरांच्या हाडांचा वापर करत दुसऱ्या हद्दीमध्ये जाऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, मात्र पोलिसांनी या बाबीमध्ये तातडीने गुन्हा दाखल करावा असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख यांनी सांगितले.
फोटो खालील ओळ – धामारी ता. शिरुर येथे अघोरी कृत्य करत केलेले पूजन.