विशाळगड किल्ला कोल्हापूर येथील गजापूर मुसलमान वाडी येथे समाजकंटकानी जो हल्ला केला त्याचा शिरूर शहर सुन्नत मुस्लिम जमातीच्या वतीने निषेध व्यक्त करत हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
याबाबतचे निवेदन शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिरम गुंजवटे यांना दिले आहे.
दिनांक 14 जुलै रोजी विशाळगडावरील गजापूर येथे काही समाजकंटकांनी हल्ला करून येथील अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान करून जीवीतास व मालमत्तेस हाणी पोहचेल असे काळीमा फासणारे कृत्य केले आहे.
या ठिकाणी व्यवसाय करणारे सर्व जाती धर्माची लोक आहेत. गडापासून गजापूर मुसलमान वाडी चार किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी असलेले लोक सर्व जाती धर्माचे आहेत त्यांच्या खाजगी जागेत मंदिर व मजिद आहे .त्यावर हल्ले करणारी उद्ध्वस्त करणारे धार्मिक स्थळांना ,दिव्य ग्रंथ कुराण फाडणे ,जाळणे, विटंबना करणे व दंगल घडवण्याचा प्रयत्न केला आहे . सर्व जाती धर्माचे नागरिकांना व प्राणीमात्राच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे.
यामुळे येथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. या पुढील काळात असे कृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी ज्या समाजकंटकांनी हा हल्ला केला त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी ही करण्यात आली.
मुस्लिम समाजाच उपाध्यक्ष नसीम खान, मुजफ्फर कुरेशी,सचिव सिकंदर मणियार, कार्याध्यक्ष जमीर सय्यद, साबीर भाई शेख, फिरोजभाई बागवान, शकीलभाई खान, हुसेन शहा उपस्थित होते.