शिरूर ( प्रतिनिधी )
तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोनच्या सोळा विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादित केले असून दोन विद्यार्थिनींनी राज्य तर चौदा विद्यार्थिनींनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवल्याची माहिती मुख्याध्यापिका प्रेमला मोहिते यांनी दिली आहे.
तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोनच्या विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत सहभाग घेतलेला अस्याना नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती निकालात शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले असताना शाळेतील यशदा थोरात, तनिषा चव्हाण या दोघींनी राज्य गुणवत्ता यादीत तर आशिष कोरी, परी गुप्ता, श्रेया पोटे, आरोही थोरात, शरयू वाघुलकर, समीक्षा गुंड, विश्र्वजा ढमढेरे, समृद्धी गोंजारी, पायल गोंधे, सान्वी गायकवाड, सेजल पिंगळे, सिद्धी वाघ, गायत्री फलफले व आर्या बोरावके या विद्यार्थिनींनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले असून सर्व यशस्वी विद्यार्थिनींना विजया चव्हाण व कल्पना जगताप या शिक्षिकेंनी मार्गदर्शन केले तर सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिकांचे मुख्याध्यापिका प्रेमला मोहिते व मिनाक्षी गवळे, केंद्रप्रमुख शरीफा तांबोळी, संभाजी भालेराव, विस्ताराधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, शालेय समितीच्या अध्यक्षा पल्लवी चौधरी, मंगेश चौधरी यांसह आदींनी अभिनंदन केले आहे.
फोटो खालील ओळ – तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील जिल्हा परिषद शाळा क्रमाक दोनचे यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक.