आगामी विधानसभा निवडणुकीत
महाआघाडीचे शासन येणार असून घरवापसी करीता अनेक जण दार ठोठावत असल्याचा असा दावा खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी करून राज्य सरकारने शेतकऱ्याच्या दुधाला इतर राज्याप्रमाणे चांगला भाव द्यावा असेही त्यांनी सांगितले.
शिरुर शहर महाविकास आघाडीचा वतीने खासदार डॉ . अमोल कोल्हे यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला .
यावेळी आमदार ॲड. अशोक पवार , प्रसिध्द उद्योगपती माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल ,माजी सभापती सुजाता पवार , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुझफ्फर कुरेशी , कॉग्रेस आयचे शहराध्यक्ष नोटरी किरण आंबेकर , माजी नगरध्यक्ष रवींद्र ढोबळे ,माजी नगरसेवक मंगेश खांडरे ,नोटरी रवींद्र खांडरे , अमोल चव्हाण,राणीताई कर्डिले, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष डॉ स्मिता कवाद, हाफिज बागवान ,राजुद्दीन सय्यद, बंटी जोगदंड, कलीम सय्यद, , आदी यावेळी उपस्थित होते .
कोल्हे म्हणाले की सर्वसामान्य माणूस ,शेतकरी, कामगार ,युवक हे ठामपणे शरद पवार यांच्या पाठीमागे लोकसभा निवडणूकीला उभे राहीले .२८ हजाराचे मताधिक्य शिरुर विधानसभा मतदारसंघातून मिळाले .विजयाचे श्रेय सर्वांचे आहे . देशाचे राजकीय चित्र ही बदलू शकते असे ते म्हणाले . राज्यातील सत्ताधारी जे वारंवार दिल्लीला जातात त्यांनी कोणते प्रकल्प महाराष्ट्रासाठी आणले असा सवाल त्यानी केला .. शासन माता भगिनीना लाडकी बहीण योजनेद्वारे पैसे देतात त्याचप्रमाणे दूध उत्पादकांना दर शासनाने वाढवून द्यावा .गुजरात मध्ये दुधाला ४०रु, कर्नाटक मध्ये ३५ रु .केरळला ४० रु दर मिळतो . तर महाराष्ट्रात दर दुधाला का वाढून मिळत नाही . शिरुरच्या तहसिलदार कार्यालयातील दलालाच्या सुळसुळाट थांबला नाही तर तेथे येवून आंदोलन करण्यात येईल . काही ठराविक साखर कारखानास सवलत दिले जाते तर काही साखर कारखान्याना घेरल जातेय हा विरोधकांचा डाव असल्याचे कोल्हे म्हणाले .
आमदार ॲड . अशोक पवार म्हणाले की १७१ को रुच्या विकासनिधी दवारे शिरुर शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम करत असल्याचे पवार म्हणाले .
प्रकाश धारीवाल म्हणाले की कोल्हे यांचे वक्तृत्व चांगले आहे. उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे .कोल्हे यांनी
शिरुरकरांचे प्रश्न सोडावावेत. शिरुर मधील झोपडीपट्टीधारकांचे प्रश्न सोडावावेत व झोपडीपट्टी धारकांना हक्कांचे घर मिळावे यासाठी खासदारांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक शिवसेनेचे शहरप्रमुख संजय देशमुख यांनी केले . पांडूरंग थोरात , राणी कर्डिले आदीनी यावेळी मनोगत व्यक्त केली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले .