गुरुजनांच्या सन्मान करण्याबरोबर व त्याच्याविषयी कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्या सोबतच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी मदतीचा हात विद्याधाम प्रशालेच्या ९३ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्याने माणूसकी प्रधान व संवेदनशील विद्यार्थ्याची पिढी घडविल्याचा आनंद , कृतार्थता व समाधानाचे भाव गृरुजनांच्या चेहरावर झळकले .
विद्याधाम प्रशालेच्या सन १९९३ च्या दहावीच्या विद्यार्थ्याच्या वतीने शिक्षक कृतज्ञता सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दहावीच्या तुकडीला शिकविणा- या शिक्षकांच्या सन्मान करण्याबरोबरच या शिक्षकांची धान्यतुला करुन त्यातून संकलित झालेले सुमारे १० पोती गहू व तांदळाची पोती शहरातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या मनशांती छात्रालय संस्था शिरुर व माहेर संस्था व अंध अपंगाची टाकळी ढोकेश्वर ता पारनेर येथील संस्थेला देण्यात आली .
येथील विद्याधाम प्रशालेच्या सन १९९३ च्या बॅचच्या वतीने गुरुजन कृतज्ञता सन्मान सोहळा व स्नेहमेळावाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल ३० वर्षानंतर विद्यार्थी एकमेकांना व आपल्या शिक्षकांना भेटले. विविध क्षेत्रात कार्यरत असणारे विद्यार्थी पाहून शिक्षकांच्या चेह-यावर समाधान व आभिमानाचा भाव निर्माण झाला .
आपल्या विद्यार्थ्यांनी धान्यतुला करुन केलेल्या सन्मान व धान्यतुलेतुन संकलित झालेले धान्य समाजातील वंचित घटकांकरिता कार्यरत असणा-या संस्थाना आमच्या हस्ते वितरित करण्यात आले . हा आम्हा शिक्षकांच्या आयुष्यातील अविस्मरणीय सुवर्णक्षण असून आम्ही सर्व या सन्मानाने कृतार्थ झालो अश्या भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या .
यावेळी माजी मुख्याध्यापक तु . म . परदेशी, घ . वा . करंदीकर , किशोर बालटे , योगेश जैन , धनाजी खरमाटे
व्ही . डी . कुलकर्णी , दादाभाउ उदमले , अब्दुलरज्जाक पठाण , राजमोहम्मद शेख ,विद्याधर पोटे , इंदुमती इसवे ,योगेश जैन , बाळासाहेब गायकवाड , विठ्ठल पडवळ ,, रतनकुमार चौथे , अनिल तांबोळी लक्ष्मीनारायण सारडा सतीश राठौड , माजी मुख्याध्यापक सुभाष वेताळ, गिरीष मुळे , अशोक आहेर , सेवक नंदु कु-हे यांची धान्यतुला करण्यात आली .
प्रशालाचे माजी मुख्याध्यापक तुलसीराम परदेशी म्हणाले की
विद्याधाम चा काळात तुम्ही शिकल्यात तो प्रशालेच्या सुवर्णकाळ होता . तुम्ही खूप मोठे व्हा , तुमच्या कार्यकर्तृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे ते म्हणाले .
हिंदीचे माजी शिक्षक अब्दुलरज्जाक पठाण यांनी धान्यतुलेच्या कार्यक्रमावर स्वरचित कविता सादर केली .त्यास उस्फूर्त दाद सर्वानी दिली .
यावेळी मनशांती छात्रालयाचे विनायक सपकाळ म्हणाले की गुरुजनांची धान्यतुला करुन संकलित केलेले धान्य समाजातील गरजू घटकांना देण्याचा उपक्रम स्त्युत्य आहे . समाजातील गरजू व वंचित घटकांच्या मदतीसाठी सर्वानी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले .
यावेळी माजी मुख्याध्यापक घनश्याम करंदीकर , अनिल तांबोळी , विठ्ठल पडवळ आदीनी मनोगत व्यक्त केली .
तर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने अतुल बोथरा , ॲड . वीरेंद्र सावंत , डॉ . रीना बोरा , तुषार दळवी , मनिषा लांडे , यांनी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा . सतीश धुमाळ यांनी केले .सूत्रसंचालन अनिता भोगावडे यांनी केले . शिक्षक परीचय विनय संघवी व विद्या वाघमारे यांनी करुन दिल्या .प्रतिज्ञा व प्रार्थना स्वाती थोरात यांनी म्हटली . आभार वर्षा काळे यांनी मानले . डॉ . रीना बोरा व अनिता भोगावडे यांनी पसायदान सादर केले.