तुरी , मका , बाजरी , हुलगा ,हरबरा , राजमा , गहू याची चोरी चोरट्याने केली .
निलेश गुलाब दंडवते (वय 32 वर्ष, रा. मलठण, महाले हॉस्पिटल शेजारी, ता. शिरूर जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजले पासून ते ३ जुलै सकाळी साडे सात वाजण्याच्या च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने मलठण येथील श्रावणी मार्बल अँन्ड स्टाईल या दुकानाचे पत्रा शेडचे गेटचे कुलुप तोडुन उघड्या शेडमध्ये प्रवेश करून तेथून दहा हजार रुपये किमंतीचे मक्याचे ८ पोते ४ हजार दोनशे रुपये किमंतीचे, तुरीचे १ पोते ५ हजार पाचशे रुपये किमंतीचे ,राजमा २ पोते ९ हजार रुपये किमंतीचे, बाजरीची पोती ६हजार ७५ रुपये किमंतीची, हुलगाची ३ पोती सात हजार रु किमंतीची हरबराचीए पोती व ४हजार चारशे रुपये किमंतीची, गहु पोती असे एकूण ४६ हजार १७५ रूपये किमंतीचे धान्य चोरुन नेले आहे .
शिरूर पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास शिरूर पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस हवालदार उमेश भगत करत आहेत .