रांजणगाव सांडस ता.शिरूर येथील महिलांनी अवैध दारू व दारूभट्ट्या विरोधात महिलांचा एल्गार...

9 Star News
0
रांजणगाव सांडस ता.शिरूर येथील महिलांनी अवैध दारू व दारूभट्ट्या विरोधात महिलांचा एल्गार...
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
        शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस ग्रामपंचायत हद्दीतील अवैध दारू, दारू भट्ट्या व दारू दुकाने बंद करावी या मागणीसाठी तीन जुलै पासून महिलांनी  अमरण उपोषण सुरू करून एल्गार पुकारला आहे.
     रुपाली संभाजी काळभोर , कविता मनोहर रणदिवे या महिलांनी  रांजणगाव सांडस ग्रामपंचायत  कार्यालय समोर आज पासून उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणात महिला पुरूष स्थानिक नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
        रांजणगाव सांडस येथे व ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक ठिकाणी अवैध ध दारूबट्ट्या व दारू विक्री सुरू आहे. यामुळे अनेक तरुण दारूच्या व्यसनाच्या आहारी पडत असून यामुळे तरूण पिढी बरबाद होत आहे. तर दारूच्या व्यसनी गेलेल्यापुरुषांचे कुटुंब पूर्णपण उध्वस्त झाले आहे. यासाठी आता आम्हीच महीला पुढाकार घेत असल्याचे उपोषणकर्त्या महिलांनी सांगून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार आहे. 
      उपोषण खालील मागण्या साठी उपोषण केले आहे .
 रांजणगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अवैद्य दारुभट्या कायमस्वरूपी बंद करावेत.
पिडीत महिला त्यांच्या मालकाला व्यसनमुक्ती केंद्रात टाकण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन यांनी सर्व खर्च करावा. पिडीत महिलाच्या मुलांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च प्रशासनाने करावा. पिडीत महिलेला घर खर्च चालवण्यासाठी लघुउद्योग सुरू करून द्यावा.
पिडीत महिला ने उपोषणानंतर भविष्यात त्यांच्या जीवाला काही बर वाईट झाल्यास त्वरित दारू विक्रेत्यांच्यावर कारवाई करावी. शाळेच्या परिसरात कमीत कमी १०० मीटरमध्ये अवैद्य धंदे बंद व्हावेत.
 दारूबंदी करत असताना पीडित महिलांना वेळोवेळी पोलीस प्रोटेक्शन द्यावे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे नाहीतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल


आम्हालाही आनंदी राहायचं आहे.आज दारूबंदी करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे.रांजणगाव सांडसच्या आसपास च्या गावांनी आम्हाला साथ द्यावी आमचाही संसार कुटुंब आनंदी राहण्यासाठी तुमच्या मदतीचा एक हात पुढे करा..
       रुपाली संभाजी काळभोर , कविता मनोहर रणदिवे
उपोषण करते.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!