शिरूर
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील केवटेमळा येथे असलेल्या वडजाई माता मंदिरातील देवीचा चांदीचा मुखवटा, सोन्याचे मणीमंगळसूत्र व आदी साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील केवटेमळा परिसरातील ग्रामस्थांनी येथील वडजाई माता मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करत देवीचा चांदीचा मुखवटा बसवलेला होता, ६ जून रोजी सकाळच्या सुमारास येथील तुषार चव्हाण हा मंदिराजवळ गेलेला असताना त्याला मंदिराच्या दरवाजा उघडा दिसल्याने त्याने मंदिरात पाहिले असता देवीचा चांदीचा मुखवटा नसल्याचे दिसल्याने त्याने याबाबतची माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी पाहणी केली असता चांदीचा मुखवटा, सोन्याचे मणीमंगळसूत्र, पितळी समई व माईक सिस्टीम चोरीला गेल्याचे समोर आले, दरम्यान शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस नाईक शिवाजी चितारे, शंकर साळुंखे, निखील रावडे यांसह आदींनी घटनास्थळी भेट देय पाहणी केली, याबाबत तुषार काशिनाथ चव्हाण वय ३० वर्षे रा. केवटेमळा शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आहे.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथे मंदिर चोरीच्या घटनेची पाहणी करताना पोलीस.