शिरूर तालुक्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे १२हजार ४६०अर्ज महिलांनी भरले
शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील ९६ ग्राम पंचायतीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑफलाइन ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शिरूर तहसील कार्यालयाच्या शासकीय कर्मचाऱ्यांना अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले असून तालुक्यात १२ हजार ४६० महिलांनी आपले अर्ज भरले असल्याचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभाग वतीने राज्यात "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण" योजना लागू करणेत आलेली आहे. शिरुर तालुक्यांतर्गत तहसिल कार्यालय शिरुर, पंचायत समिती कार्यालय शिरुर व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय शिरुर यांच्या संयुक्त विद्यमाने गाव पातळीवर पात्र लाभार्थी महिलांचे ऑफलाईन व ऑनलाईन फॉर्म भरुन घेणेसाठी गाव निहाय आराखडा तयार करणेत आलेला असून त्या दृष्टीने आवश्यक नियोजन करणेत आले आहे.
नियोजनानुसार तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, संबंधित ई सेवा केंद्र, समूह संसाधन केंद्र यांचे दिनांक ४ जुलै पासून प्रत्यक्ष ऑफलाईन व ऑनलाईन फॉर्म भरुन घेणेची कार्यवाही सुरु झालेली असून तालुक्यातील एकुण ९६ ग्रामपंचायत स्तरावर दि.९/७/२०२४ पासून दैनंदिन शिबिरांचे आयोजन करणेत आलेले असून योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सदर गावांमध्ये आज अखेर एकुण १२४६० ऑफलाईन व ऑनलाईन फॉर्म भरुन घेणेत आलेले आहेत. सदर फॉर्म भरुन घेत असताना महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत असून केलेल्या नियोजनाबाबत ग्राम स्तरावर समाधान व्यक्त केले जात आहे..
शिरूर उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे देवकाते, शिरूर तहसिलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी महेश डोके, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प शिरूर निर्मला चोभे,
वैशाली सटाले, सहाय्यक अधिकारी संगीता बेंगाळ,
शिरूर यांचे संपूर्ण कामकाजावर नियंत्रण असून यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुक्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ध भरून घेणे व जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
