शिरूर दिनांक प्रतिनिधी
संविदने ता. शिरूर येथील टेकडीवरील श्री. काळुबाई मंदीराच्या टेकडीवरील काळुबाई मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरामध्ये प्रवेश करून देवीचे सोन्याचे दागिने व साऊंड सिस्टिम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.
याबाबत बाबाजी ज्ञानेश्वर नरवडे (वय 38 वर्षे धंदा शेती रा. संविदने ता. शिरूर) यांनी फिर्याद दली आहे.
शिरूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना १० जुलै रात्रीचा ते ११ जुलै सकाळी सातच्या दरम्यान घडली असून, साऊंड सिस्टिम कोणी नेली आहे का याची चौकशी करत होते परंतु याबाबत कुठे माहिती न मिळाली त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांबरोबर साऊंड सिस्टिमही चोरी गेल्याची खात्री झाल्यानंतर आज दिनांक २५ जुलै रोजी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 10 जुलै रात्री सात ते 11 जुलै सकाळी सातच्या दरम्याण संविदने येथील टेकडीवरील श्री काळुबाई मंदीर येथे कोणीतरी अज्ञात चोरटयाने मंदीराच्या दरवाजाचे कुलुप कशानेतरी तोडुन मंदीरात प्रवेश करून मंदीरातील देवीचे सोन्याचे मंगळसूत्र सोन्याचे दागिने व आहूजा कंपनीची साऊंड सिस्टिम असा ऐकून ३४ हजाराचा ऐवज चोरून नेला आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले करीत आहे.