ज्ञानेश्वर तांबेच्या शोधासाठी शिक्रापूर पोलिस पंढरपुरात

9 Star News
0
ज्ञानेश्वर तांबेच्या शोधासाठी शिक्रापूर पोलिस पंढरपुरात
शिरूर 
( प्रतिनिधी ) वरुडे ता. शिरुर येथील ज्ञानेश्वर तांबे हे तीन वर्षापासून बेपत्ता त्यांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन या जाहिरात फलकावर दिसल्याने खळबळ उडाली असताना पोलिसांनी अखेर तीन वर्षांनी सदर इसम बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार नोंदवली असताना शिक्रापूर पोलिसांचे पथक ज्ञानेश्वर तांबेच्या शोधासाठी साध्या वेशात पंढरपुरात दाखल झाले आहे.
                    वरुडे ता. शिरुर येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे तीन वर्षापासून बेपत्ता असताना कुटुंबीयांनी शोध घेऊन ज्ञानेश्वर मिळाले नाही, अचानक मुख्यमंत्र्यांच्या वतीने काढलेल्या ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन या जाहिरातवर ज्ञानेश्वर तांबेंचा फोटो आल्याने खळबळ उडाली तर मुख्यमंत्री ज्याप्रमाणे जेष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवणार त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला वडिलांचे दर्शन घडवून द्यावे अशी मागणी ज्ञानेश्वरांचे चिरंजीव भरत तांबे यांनी केल्याने पोलीस प्रशासनाने भारत ज्ञानेश्वर तांबे वय ४१ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. वरुडे ता. शिरुर जि. पुणे यांच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर बेपत्ता झाल्याबाबत नोंद केली, तर पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस नाईक विकास पाटील, जयराज देवकर यांनी साध्या वेशात थेट पंढरपूर गाठत मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीमध्ये असेलल्या बेपत्ता ज्ञानेश्वर यांचा पंढरपूर मधील धर्मशाळा, मठ, मंदिर परिसर, वाळवंट, चंद्रभागेच्या तीरी सर्वत्र शोध घेत पंढरपूर पोलिसांची मदत घेत तांबे यांच्या शोधकार्याबाबत पत्रके देखील चिटकवली आहेत, तर ज्ञानेश्वर तांबे हे कोठे आढळून आले तर पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.
सोबत – वरुडे ता. शिरुर येथील बेपत्ता इसमाचा पंढरपूरमध्ये शोध घेताना पोलिसांचे पथक व ज्ञानेश्वर तांबे यांचा फोटो
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!