शिरुर तालुक्यातील ७२ गावे बिबट प्रवणक्षेत्र घोषितजिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेंची माहिती जिल्ह्यात २३३ गावे

9 Star News
0
शिरुर तालुक्यातील ७२ गावे बिबट प्रवणक्षेत्र घोषित
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेंची माहिती जिल्ह्यात २३३ गावे
शिरूर 
( प्रतिनिधी ) पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढू लागला असताना अनेक दुर्घटना देखील समोर येत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पुणे जिल्ह्यातील २३३ अतिसंवेदनशील गावांना संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केले असून त्यामध्ये शिरुर तालुक्यातील ७२ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.        
                              शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यात सात वनपरिक्षेत्र कार्यालय असलेल्या गावांमध्ये शेतीचे क्षेत्र मोठे असल्याने येथे पाण्यासाठी असलेल्या नद्या तसेच चासकमान कालवे यामुळे शेती मोठ्या प्रमाणात असल्याने येथे ऊस, डाळिंब, मका यांसह आदी पिकांची शेती तसेच डोंगर यांमुळे बिबट्याला मुबलक वातावरण तसेच भक्ष मिळत असल्याने बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढू लागलेला असताना कित्येक ठिकाणी बिबट्याने नागरिकांसह जनावरांवर हल्ले केल्याने काही दुर्घटना घडून नागरिकांचा जीव सुद्धा गेलेला असल्याने गेली काही दिवसांपासून काही तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना झपाट्याने वाढत असल्याने पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिसवे यांनी पुणे जिल्ह्यातील शिरुर, जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यांतील २३३ गावे संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केले असताना शिरुर तालुक्यातील ७२ गावांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील सदर तालुक्यांना गेल्या चार महिन्यात दोन इसम गंभीर जखमी तर चौघांच्या मृत्यूची घटना घडलेली असून पाच वर्षात चाळीस जण गंभीर जखमी होऊन सोळा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने पुढील कामात नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
स्वतंत्र चौकट १ –
शिरुर तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्र घोषित गावे . . . . . .
अण्णापूर, अरणगांव, आपटी, आलेगाव पागा, इनामगांव, करंदी, कुरुळी, गणेगाव दुमाला, गुणाट, पिंपरखेड, चांडोह, चिंचणी, जांबूत, जातेगाव खुर्द, टाकळी हाजी, तांदळी, निमगाव म्हाळुंगी, निमोणे, न्हावरा, पिंपळसुटी, फाकटे, बाभुळसर बुद्रुक, मांडवगण फराटा, म्हसे बुद्रुक, रांजणगांव सांडस, रासाई, वडनेर खुर्द, वढु बुद्रुक, शरदवाडी, शिरुर ग्रामीण, सादलगांव, शिवतक्रार म्हाळुंगी, टाकळी भिमा, कोरेगाव भिमा, काठापुर खुर्द, आमदाबाद, आंधळगाव, आंबळे, उरळगाव, करंजावणे, कर्डेलवाडी, कवठे येमाई, कोंढापुरी, कोळगाव, डोळस, गणेगाव खालसा, जातेगाव बुद्रुक, डोंगरगण, तळेगाव ढमढेरे, दहिवडी, धामारी, निमगाव दुडे, निमगाव भोगी, निर्वी, पारोडी, बाभुळसर खुर्द, बुरंजवाडी, भांबर्डे, मलठण, दरेकरवाडी, माळवाडी, मुखई, वरुडे, वाघाळे, विठ्ठलवाडी, शिंदोडी, शिरसगाव काटा, सविंदणे, सणसवाडी, धानोरे, नागरगाव, डिग्रजवाडी हि गावे बिबट प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
स्वतंत्र चौकट २ –
शिरुर तालुक्यातील सर्व बिबट प्रवण क्षेत्रात वनविभागाच्या माध्यमातून मानव व बिबट संघर्ष कमी करण्याबाबत जनजागृती मोहीम सुरु करण्यात आलेली असून सर्व ठिकाणी विशेष उपाययोजना करण्यात येत असल्याचे शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी सांगितले.
सोबत – बिबट संग्रहित फोटो.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!