शिरूर प्रतिनिधी
कान्हूर मेसाई ता. शिरुर येथील आपल्या मित्राच्या पत्नीने आधीचनिधन झालेले असताना आता मित्राचे देखील निधन झाल्याने त्याची दोन बालके निराधार झाल्यानेया बालकांच्या कल्याणासाठी सारे ग्रामस्थ सरसावले असून त्यांनी सर्वांनी २ लाख ३२ हजारांचीमदत या निराधार बालकांच्या आत्याकडे सुपूर्त केली आहे. 
कान्हूर मेसाई ता. शिरुर येथीलयेथील राहुल पुंडे यांच्या पत्नी शुभांगी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झालेले असतानानुकतेच राहुल यांचे सुद्धा निधन झाले असल्याने त्यांची स्वरा व अर्णव हि दोन्ही लहानबालके निराधार झालेली असल्याने त्यांचा सांभाळ सध्या राहुल यांची बहिण लता डफळ या करतअसल्याने या बालकांसाठी काही मदत करण्याचे हेतून समाजसेवक शहाजी दळवी व पोलीस भरत पुंडेयांनी सोशल मीडियातून मदतीचे आवाहन केले असता तब्बल दोन लाख ३२ हजारांची मदत संकलितझाली असून सदर मदत राहुल पुंडेच्या दशक्रियाच्या दिवशी नुकतीच मुलांचा सांभाळ करणाऱ्यामुलांची आत्या लता डफळ यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आहे.फोटो खालीलओळ – कान्हूर मेसाई ता. शिरुर येथील निराधार बालकांची मदत मुलांच्या आत्याकडे देतानाग्रामस्थ व आदी.सोबत –निराधार स्वरा व अर्णवचा फोटो.