शिरुर वनविभागाचा मानव व बिबट संघर्ष रोखण्यासाठी उपक्रम
शिरूर
( प्रतिनिधी ) शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचे नागरिकांना दर्शन होऊन अनेक नागरिक व पशुधनावर बिबट्याचे हल्ले होत असल्याने शिरुर वनविभागाने पुढाकार घेऊन मानव व बिबट संघर्ष रोखण्यासाठी उपक्रम हाती घेत शिरुर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये बिबट जनजागृती मोहीम सुरु केली आहे.
शिरुर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याने नागरिकांवर हल्ले केल्याने काही नागरिकांचा मृत्यू होऊन कित्येक ठिकाणी पशुधनवार बिबट्याने हल्ले करत ठार केल्याचे समोर आलेले असताना बिबट व मानव यांच्यातील संघर्ष कमी करणे गरजेचे असल्याने शिरुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गौरी हिंगणे व गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक प्रमोद पाटील, बबन दहातोंडे, विशाल चव्हाण, संतोष भुतेकर, नारायण राठोड, लहू केसकर, चालक अभिजित सातपुते तसेच शिरुर वनविभाग रेस्क्यू टीमचे हनुमंत कारकुड, महेंद्र दाते, नवनाथ गांधीले, शेरखान शेख, अमोल कुसाळकर, जयेश टेमकर, अविनाश सोनवणे, शुभम वाघ, रोहित येवले, शुभम शिस्तार, सुदर्शन खराडे, श्रेयस उचाळे, शौकत शेख, ऋषिकेश विधाटे, शरद रासकर यांनी शिरुर तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जुआन जाऊन शाळांमध्ये बिबट्यापासून संरक्षण करण्याबाबतच्या उपाययोजनांची माहिती शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना देत जनजागृती मोहीम सुरु केली असून यावेळी शालेय विद्यार्थ्यांना घ्यावयाची काळजी व खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
फोटो खालील ओळ – शिरुर तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी वनविभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करण्यात येत असलेले मार्गदर्शन.
\