शिरूर दिनांक
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावरुन गोमांस वाहतूक करणाऱ्या कारसह चार टन गोमांस जप्त करत गोमांस वाहतूक करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर पोलिसांनी नजर जब्बार कुरेशी (वय २७ वर्षे रा. झेंडीगेट अहमदनगर )असे पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
याबाबत पोलीस शिपाई अंबादास अश्रुबा थोरे (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे शिक्रापूर ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावरुन एका कार मधून गोमांसाची यांची केली जात असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांना मिळाली त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवलदार शंकर साळुंखे, पोलीस शिपाई अंबादास थोरे यांनी कासारी फाटा येथे सापळा लावला असता त्यांना एक संशयित स्विफ्ट कार आल्याचे दिसून आले, दरम्यान पोलिसांनी कार चालकाला थांबवत कारची पाहणी केली असता कार मध्ये गोमांस आढळून आल्याने पोलिसांनी कारसह कार चालकाला ताब्यात घेतले, त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर गोमांस अहमदनगर येथून आणले असून पुणे येथे घेऊन चालल्याचे सांगितले तर पोलिसांनी कार सह चार टन गोमांस जप्त केले,
याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे
गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आहे.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर पोलिसांनी जप्त केलेली गोमांस वाहतूक करणारी कार.