शिरूर शहरांतील भरवस्तीमध्ये तीन दिवसात दोन वेगळ्या घटनेत दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र किंमत दीड लाखाचा ऐवज मोटरसायकल वरून आलेल्या दोन चोरट्याने जबरदस्तीने ओढून नेल्याच्या घटना घडली आहे.
दोन्ही घटनेत दोन जणांवर रोड रॉबरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत शशिकला मूळचंद गादिया (वय ७३ वर्षे रा. मुंबई बाजार शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे शशिकला गादिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २१ जून रोजी सकाळीं सहा वाजता शिरुर शहरातील काचीआळी येथून मॉर्निंग वॉक साठी शशिकला गादिया या ज्येष्ठ महिला जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी गादिया यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र किंमत 60 हजार किंमत ,हिसकावून ओढून घेऊन पळून गेले, फिर्यादी वरून पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांवर रोड रॉबरीचा गुन्हा दाखल केला असून,
पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहे.
शिरूर पोलीसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक २४ जून दुपारी दोनच्या दरम्यान फिर्यादी कविता भोसले व त्यांची मैत्रीण आशा बोरा या दोघीजणी गावात कामानिमित्त निघाली असता शिरूर विद्याधाम शाळेजवळील जुने प्रसूतीग्रह बोरा हॉस्पिटल या भरवस्तीच्या ठिकाणी आले असता अचानक समोरून मोटरसायकलवर आलेल्या दोघा 20 ते 25 वय गटाच्या तरुणांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र किँमत नव्वद हजार किंमतीचे हिसका देऊन जबरदस्तीने ओढून घेऊन शिरूर पोलीस स्टेशन समोर सतारा कमानी पुलाकडे जोरात गाडी चालून पळून गेले. या तरुणांनी काळे जॅकेट व तोंडाला बांधले होते.
याबाबतची रोड पोलीस स्टेशन येथे रोड रॉबरी चा गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पवार करीत आहे.