उपसरपंच सारिका सासवडे यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण उपक्रम
शिरूर दिनांक
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील उपसरपंच सारिका सासवडे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा मोफत ऑक्सिजन मिळवा या उपक्रमाचे निमित्ताने गावातून वृक्षदिंडी काढून नागरिकांना झाडांचे महत्व पटवून देत विविध देशी व औषधी अशा २७०० झाडांचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले आहे.
शिक्रापूर ता. शिरुर ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच सारिका सासवडे यांच्या पुढाकाराने झाडे लावा झाडे जगवा मोफत ऑक्सिजन मिळवा या उपक्रमाचे निमित्ताने गावातून वृक्षदिंडी आयोजित करण्यात आली होती, यावेळी सरपंच रमेश गडदे, उपसरपंच सारिका सासवडे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष खैरे, विशाल खरपुडे, प्रकाश वाबळे, पूजा भुजबळ, मोहिनी संतोष मांढरे, वंदना भुजबळ, सीमा लांडे, उषा राऊत, बाजार समितीचे संचालक बाबासाहेब सासवडे, सोमनाथ भुजबळ, विद्याधाम प्रशालेचे प्राचार्य सोनबापू गर्दे, कृषी सहाय्यक अशोक जाधव, रमेश करपे, विद्या घाडगे, उत्तम सासवडे, संदीप टेमगिरे, मंगेश शेंडे, दिपक भुजबळ, गणेश लांडे, विशाल घावटे, आकाश साळुंखे यांसह आदी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते, दरम्यान गावातील नागरिकांना वृक्षाचे महत्त्व पटवून देत घराच्या परिसरात लावण्यासाठी जांभूळ, आवळा, बेल, आपटा, फणस, पेरू, नारळ, कवट, गुलमोहर, चिंच, बदाम लक्ष्मीतरु या विविध औषधी व देशी झाडांचे वाटप करण्यात आले, यावेळी या विविध देशी झाडांचा मानवी जीवनावर तसेच विविध आजारांवर कसा उपयोग होतो याबाबतचे प्रबोधन शास्वत विकास फौंडेशनचे प्रभाकर जगताप यांनी केले, तर सर्वांनी झाडे लावावी व झाडे लहान मुलाप्रमाणे जपावी असे आवाहन उपसरपंच सारिका सासवडे यांनी केले, यावेळी सरपंच रमेश गडदे यांनी सर्वांचे आभार मानले.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथे वृक्षरोपण व वाटप करताना पदाधिकारी.