शिरूरचें जुन्या पिढीतील मुख्याध्यापक मिश्रीलालजी जोशी गुरुजी यांचे निधन

9 Star News
0
शिरुर दिनांक ( वार्ताहर )
येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ्य नागरीक व माजी मुख्याध्यापक मिश्रीलाल हिरालाल जोशी गुरुजी वय- ९९ वर्ष यांचे वृध्दापकाळाने निधन झाले .
त्याच्या पश्चात पत्नी , १ विवाहित मुलगी , २ मुले , सूना , नातवंडे असा परीवार आहे .
जोशी हे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते . त्याच बरोबर शिरुर शहरात गृहरक्षक दल सुरु करण्याबाबत त्यांनी पुढाकार घेतला होता . शिरुर नगरपरिषदेच्या लाटेआळीतील मराठी शाळा क्रमांक -१ चे मुख्याध्यापक म्हणून ही त्यांनी काम केले . ते प्रसिध्द असे छायाचित्रकार ही होते . परिसरातील सामाजिक , शैक्षणिक व धार्मिक उपक्रमामध्ये त्यांच्या सहभाग असायचा . ॲड . रमेश जोशी व ॲड . बाळकृष्ण जोशी यांचे ते वडिल होत . तर फोटोग्राफर आनंद जोशी व आशिष जोशी यांचे ते आजोबा होत .
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!