शिरूर
( प्रतिनिधी ) जातेगाव खुर्द ता. शिरुर येथे दिराच्या लग्नासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण अज्ञात दुचाकीस्वारांनी लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात दुचाकी स्वारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जातेगाव खुर्द ता. शिरुर येथील सुजाता मासळकर या काही कामाच्या निमित्ताने सध्या मोशी येथे राहण्यास असून सध्या त्यांच्या दिराचे लग्न असल्याने २७ जून रोजी सुजाता या गावी आलेल्या होत्या, दुपारच्या सुमारास सुजाता या वाहनातून उतरुन घराकडे जात असताना पाठीमागून दोन दुचाकीस्वार आले ते काही अंतर पुढे जाऊन पुन्हा मागे वळून आले, दरम्यान दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाने सुजाता यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून दोघेजण पळून गेले, याबाबत सुजाता धनंजय मासळकर वय ५३ वर्षे सध्या रा. मोशी प्राधिकरण ता. हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी दोन अज्ञात दुचाकी चालकांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आहे.