शिरूर आर. एम. धरिवाल इंग्लिश मेडीयम स्कुल, मध्ये जागतिक योग दिन

9 Star News
0
शिरूर आर. एम. धरिवाल इंग्लिश मेडीयम स्कुल, मध्ये 
जागतिक योग दिन

शिरूर दिनांक प्रतिनिधी 
शिरूर येथील आर एम धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक योग दिनानिमित्त योगासने प्रार्थना घेऊन योग दिन साजरा करण्यात आला आहे.
 आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 जागतिक योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्या अनुषंगाने
 आर. एम.धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर या शाळेतही योग दिन अतिशय उत्साहात साजरा केला.
 इयत्ता पहिली ते चौथी व इयत्ता पाचवी ते दहावी अशा दोन गटांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रार्थना आसने ओंकार ध्यान  केले.

 शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी  घारू  यांनी योग दिनाची माहिती देउन सर्व विद्यार्थ्यांना  योग म्हणजे काय, योग करण्याचे फायदे काय, योगाचे जनक कोण आहेत, योग किती वर्षांपूर्वी प्रचलित झाला?अशी अनेक प्रकारची योगासंबंधीची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

 माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका व योगशिक्षिका अपर्णा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन संपन्न झाला.अरुणा कुलकर्णी व विद्यार्थिनी कशिश मांडगे यांनी सहशिक्षिका म्हणून काम केले.
 विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातही रोज योग करावा असा संदेश देत विश्वशांती प्रार्थना ने कार्यक्रमाची सांगता झाली.

 सदर कार्यक्रमाचे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष व शालेय समितीचे अध्यक्ष अनिल बोरा, संस्थेचे सचिव  नंदकुमार निकम, शालेय समितीचे सदस्य प्रकाशजी धारिवाल, धरमचंदजी फुलफगर राजेंद्रजी भटेवरा यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण  विकासासाठी असेच दर्जेदार कार्यक्रम वर्षभर राबवावेत अशी सदिच्छा व्यक्त केली.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!