धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिरूर व पंचक्रोशी शिव व शंभू भक्तांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर सायंकाळी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीतील छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा मिरवणुकीचे आकर्षण ठरला.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिरुर शहर व पंचक्त्म्रोशीतील शिव व शंभु भक्तांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात अस्ले होते .
शिरुर नगरपरीषदेच्या मंगल कार्यालयात या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .
छ्त्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन या शिबीराची सुरवात झाली या शिबीरात १५२ रक्तदात्यांनी या शिबीरात रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्यांना प्रमाण पत्र व शंभुराजे हे पुस्तक भेट देण्यात आले तसेच भाग्यवंत वीस रक्तदात्यांना शककर्ते शिवराय हे शिवचरित्र भेट देण्यात येणार आहे या वेळी शिरुर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी ६४ वे रक्त दान केले . भोसरी येथील संजीवनी रक्त केंद्र यांनी रक्त संकलीत केले .
सायंकाळी पाच नंतर शहरातुन मिरवणुक काढण्यात आली .
फोटो रक्तदान शिबीरात रक्तदात्यांना प्रमाणपत्र देताना आयोजक