शिरूर दिनांक ( प्रतिनिधी )
रांजणगाव गणपती ता. शिरुर येथे रोहितला फोन का करते असे म्हणून महिलेने दुसऱ्या महिलेवर चाकुने वार करत महिलेला गंभीर जखमी केली आहे. याबाबत महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे संयुक्ता खैरे (रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे)या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कविता रामनाथ माळी (वय २७ वर्षे रा. नरेंद्रकुंज बिल्डींग रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे )यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे .
ही घटना 20 जून रात्री सव्वा अकरा वाजता घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील नरेंद्रकुंज बिल्डींग मध्ये राहणारी कविता माळी हि महिला घरी असताना तिने तिच्याबरोबर राहणारा रोहित याला त्याच्या मोबाईल नंबर वर पाच ते सहा वेळा फोन केले परंतु फोन उचलला गेला नाही. त्यानंतर पंधरा मिनिटांनी माळी यांच्या घराचा दरवाजा वाजला त्यांना वाटल रोहित आला म्हणून त्यांनी दरवाजा खोलला त्यावेळेस त्यांच्यासमोर संयुक्ता खैरे हि महिला कविता यांच्या घरी आली, दरम्यान संयुक्ता हिने कविता हिस शिवीगाळ, दमदाटी करत तू रोहितला फोन का करतेस असे विचारले असता माळी हिने आम्ही बरोबर राहतो असे तिला सांगितले त्याचा राग येऊन संयुक्तl हीने तिच्या जवळी
चाकूने माळी यांच्या गळ्यावर व हातावर वार करत गंभीर जखमी केले यावेळेस आरडा ओरड झाल्याने बाजूचे लोक तिथे आले त्यानंतर संयुक्त खैरे निघून गेली. गंभीर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले.
याबाबत कविता रामनाथ माळी (वय २७ वर्षे रा. नरेंद्रकुंज बिल्डींग रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे )यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी संयुक्ता खैरे (रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे )या महिलेवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वैभव मोरे हे करत आहे.