बिबट्याचा हल्ला कि घातपात कारण अद्याप अस्पष्ट
शिरूर दिनांक
( प्रतिनिधी ) दहिवडी ता. शिरुर येथील मांजरेवस्ती येथे यश शरद गायकवाड या दहा वर्षीय बालकाचा उसाच्या शेतात मृतदेह मिळून आला मात्र यावेळी बिबट्याने बालकाला शेतात नेल्याची अफवा पसरली मात्र अद्याप पर्यंत या बालकावर बिबट्याचा हल्ला कि घातपात हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या तपासासाठी श्वानपातकही पुण्यावरून आले होते परंतु माग काही मिळाला नाही.
दहिवडी ता. शिरुर येथील मांजरेवस्ती येथे यश गायकवाड हा दुपारच्या सुमारास घराच्या पाठीमागे शौचास गेलेला होता, त्यांनतर बराच वेळ तो दिसून न आल्याने घरच्यांसह नागरिकांनी त्याचा शोध घेतला असता सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास यश ऊसाच्या शेतात मिळून आला, त्यांनतर यशला बिबट्याने ऊसाच्या शेतात नेल्याचे बोलले जाऊ लागले मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता कोठेही बिबट्याच्या पावलाचे ठसे मिळून आले नाही तर यशच्या शरीरावर आढळून आलेल्या जखमा संशयास्पद वाटून आल्याने खळबळ उडाली, त्यामुळे यशच्या मृत्यूचे नेमके कारण मिळवण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन ससून मध्ये करण्यात आले, तर आज सकाळपासून जुन्नर विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे, शिरुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप, वनपाल गौरी हिंगणे, गणेश पवार, वनरक्षक वनरक्षक प्रमोद पाटील, बबन दहातोंडे, विशाल चव्हाण, संतोष भुतेकर, नारायण राठोड, चालक अभिजित सातपुते, माणिकडोह बिबट निवारण केंद्राचे प्रमुख महेंद्र ढोरे, रेस्क्यू टीमचे अमोल कुसाळकर, शरीफ शेख, नवनाथ गांधीले, जयेश टेमकर, शेरखान शेख, हनुमंत कारकुड यांसह आदींनी घटनास्थळी ठाण मांडून सदर ठिकाणी चार पिंजरे, पाच ट्रेप कॅमेरे लावत, द्रोण कॅमेऱ्याच्या सहाय्याने परिसरात पाहणी केली, तर पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, महेश डोंगरे यांसह आदींनी भेट देऊन पाहणी केली तर यावेळी श्वान पथक देखील दाखल झाले, असून यशच्या मृत्यूबाबत कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
स्वतंत्र चौकट १ –
दहिवडी येथील घटनेमध्ये मुलाच्या मृत्यूबाबत संशय असल्याचे त्याचे शवविच्छेदन ससून मध्ये करण्यात आले तसेच त्या मुलाच्या जखमेवरील रक्ताचे नमुने घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहे त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल तसेच परिसरात बिबट्याचा वावर असल्याने बिबट्या पकडण्याच्या उपाययोजना केल्या असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी सांगितले.