शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे शेततळ्यात बुडणाऱ्या पाच मुलांना वाचवणारा देवदूत म्हणून इनामगावचे उपसरपंच सुरज मचाले धावून आल्याचे गौरव उदगार शिरूर शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड.किरण आंबेकर यांनी व्यक्त केले.
इनामगावचे उपसरपंच सूरज मचाले यांनी चार दिवसांपूर्वी एका शेततळ्यात बुडणार्या पाच मुलांना जीवदान देण्याचे महान काम केले
.अशा या देवदूताचा सत्कार मुंबई बाजार व कुंभारआळी महिला मंडळ व आधार छाया फाऊंडेशन तर्फे करण्यात आला.त्यावेळी घडलेल्या प्रसंगाचा थरारक अनुभव ऐकून अंगावर रोमांच उभे राहिले.त्यांच्या धाडसाचे कौतुक सर्वानीच केले.
या कार्यक्रमाला सविता बोरुडे,डॉ. वैशाली साखरे ,प्रिती बनसोडे ,ज्योति हांडे,सारिका विरशैव ,सुजाता रासकर ,मंगल गायकवाड,वैशाली ठुबे शितल शर्मा,स्वप्नाली जामदार,तृप्ती जोशी, माया महाजन, अॅड. किरण आंबेकर, अजीम सय्यद व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिरूर अबेलीचे आमदार अशोक पवार यांनीही उपसरपंच सुरज मचाले यांचा धाडसाचे कौतुक केलं व त्यांचा सत्कार केला.