शिरूर दिनांक
( प्रतिनिधी ) कोंढापुरी ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एका वानराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली असून वनविभागाच्या वतीने वानराचा पंचनामा करत वानराला ताब्यात घेऊन त्याचे दहन करण्यात आहे.
कोंढापुरी ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एका वानराला वाहनाची धडक बसून वानर ठार झाल्याचे काही नागरिकांना दिसले, याबाबतची माहिती शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांना मिळताच वनपाल गौरी हिंगणे, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व वनविभाग रेस्क्यू टीमचे सदस्य शेरखान शेख, अमोल कुसाळकर यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता अंदाजे पाच वर्षे वयाच्या नर जातीच्या वानराचा वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याचे दिसले तर यावेळी वनविभाग अधिकारी व प्राणी मित्रांनी मृत वानराचा पंचनामा करुन वानराचा मृतदेह ताब्यात घेतला दरम्यान सदर मृत वानराचे शवविच्छेदन करत त्याचे शासकीय जागेत दहन करण्यात आले आहे.