शिक्रापुरात तोंडात बरणी अडकलेल्या कुत्र्याची सुटका

9 Star News
0
शिक्रापुरात तोंडात बरणी अडकलेल्या कुत्र्याची सुटका
शिरूर 
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील करंजेनगर येथे दोन दिवसांपासून तोंडात प्लास्टिकची बरणी अडकलेल्या एका कुत्र्याची सुटका करुन मुक्तता करण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे.
                          शिक्रापूर ता. शिरुर येथील करंजेनगर येथे दोन दिवसांपासून एक कुत्रा तोंडात प्लास्टिकची बरणी अडकलेल्या अवस्थेत फिरत होता, याबाबतची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख यांना मिळताच शेरखान शेख, सर्पमित्र अमोल कुसाळकर, पशुपक्षी चिकित्सक डॉ. नितीन सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते विकास माने यांसह आदींनी सदर ठिकाणी धाव घेत, मोठ्या शिताफीने सदर कुत्र्याला पकडून त्याचा तोंडात अडकलेली बरणी काढून घेतली यावेळी पशुपक्षी चिकित्सक डॉ. नितीन सोनवणे यांनी सदर कुत्र्याची तपासणी करत त्याची तातडीने मुक्तता करण्यात आली, तर दोन दिवसांपासून बरणी अडकलेल्या कुत्र्याची सुटका झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले तर उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याच्या शोधात कुत्र्याने बरणीत तोंड घातले असावी व कुत्र्याचे तोंड बरणीत अडकले असल्याची शक्यता सर्पमित्र शेरखान शेख यांनी वर्तवली दरम्यान नागरिकांनी सर्व प्राणिमात्रांचे आभार मानले.
फोटो खालील ओळ - शिक्रापूर ता. शिरूर येथे तोंडात बरणी अडकलेल्या कुत्र्याची सुटका करताना प्राणीमित्र व आदी.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!