कोंढापुरीत ता . शिरूर येथे वाढदिवसासाठी आलेल्या पत्नीवर पतिचा चाकू हल्ला

9 Star News
0
कोंढापुरीत वाढदिवसासाठी आलेल्या पत्नीवर पतिचा चाकू हल्ला
शिरूर 
(  प्रतिनिधी ) कोंढापुरी ता. शिरुर येथे बहिणीच्या मुलीच्या वाढदिवसासाठी आलेल्या महिलेवर महिलेच्या पतीने चाकूने हल्ला करून जखमी केले जाते.
केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पती  विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                अजय बाबुराव खरात (वय ४३ वर्षे रा. तांदूळवाडी ता. बारामती जि. पुणे  ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .   
          पल्लवी अजय खरात (वय ३९ वर्षे रा. तांदूळवाडी ता. बारामती जि. पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
 याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे कोंढापुरी ता. शिरुर येथे पल्लवी खरात या त्यांच्या बहिणीच्या मुलीच्या वाढदिवसासाठी आलेल्या असताना पल्लवी या सुल्झर कंपनी शेजारुन त्यांच्या बहिणीच्या घरी जात असताना पाठीमागून अचानक महिलेचा पती अजय खरात हा आला त्याने महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत जवळील चाकूने महिलेच्या शरीरावर वार केले, या घटनेत पल्लवी अजय खरात वय ३९ वर्षे रा. तांदूळवाडी ता. बारामती जि. पुणे हि महिला जखमी झाली असून सदर महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अजय बाबुराव खरात वय ४३ वर्षे रा. तांदूळवाडी ता. बारामती जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!