शिक्रापुरात मद्यधुंद चालक कारसह थेट एटीएम मध्येतळमजल्यातील एटीएम सेंटर मध्ये कार शिरल्याने खळबळ

9 Star News
0
शिरूर 
( प्रतिनिधी )
 शिक्रापूर ता. शिरुर येथील चाकण चौक परिसरातील एका बियरबारच्या खालील मजल्यावर असेलल्या एका एटीएम सेंटर मध्ये एका मद्यधुंद अवस्थेतील चालकाच्या ताब्यातील कार शिरल्याने एक कार शिरल्याने एटीएमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र तळमजल्यातील एटीएम सेंटर मध्ये कार शिरल्याने खळबळ उडाली आहे.
                               शिक्रापूर ता. शिरुर येथील चाकण चौक परिसरात बालाजी बियरबारच्या बिल्डींग मध्ये तळ मजल्यामध्ये आयसिआयसिआय बँकेचे एटीएम आहे, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एक मद्यधुंद सदर इमारत समोर उभ्या केलेल्या त्याच्या एम एच १२ डब्ल्यू के ८७३९ या कार मध्ये बसला, यावेळी त्याने कार चालू केल्यानंतर कार थेट समोरील इमारतच्या पायऱ्या उतरुन खालील तळ मजल्यात असलेल्या आयसिआयसिआय बँकेच्या एटीएम मध्ये शिरली आणि काचा व मशीन तोडून भिंतीवर जाऊन आदळली यावेळी एटीएमच्या मशीन सह आदी नुकसान झाले, घटनेची माहिती मिळताच पोलीस शिपाई विकास मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत सदर एटीएम सेंटर बंद करत बँकेला माहिती दिली, तर याबाबत नामदेव निवृत्ती दळवी वय ३६ वर्षे रा. मलठण ता. दौंड जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी एम एच १२ डब्ल्यू के ८७३९ या कार वरील अज्ञात चालकावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. 
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथे थेट एटीएम सेंटर मध्ये शिरलेली कार.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!