महिलांच्या आरोग्याबाबत जागृत असणे गरजेचे -डॉ.सुनीता पोटे

9 Star News
0
*महिलांच्या आरोग्याबाबत जागृत असणे गरजेचे .....डॉ.सुनीता पोटे*
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
विकसित आणि सदृढ भारताच्या निर्मितीसाठी महिलांच्या आरोग्याबाबत शासनाने तसेच विविध अशासकीय संस्थांनी जागृत राहून महिलांना आरोग्याबाबत साक्षर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माहेर मधील सर्व गृहमातांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करताना डॉ.सुनिता पोटे यांनी केले. 

    कार्यक्रमाला माजी सरपंच जिजाताई दुर्गे,माहेर संस्थेच्या अध्यक्ष हिरा बेगम मुल्ला,स्वाती पाटील,मीरा गायकवाड,रमेश दुतोडे,रमेश चौधरी उपस्थित होते. माहेर संस्था गेल्या २७ वर्षापासून कार्यरत असून या संस्थेत १००० मुलं,४०० मुली,२०० बाबा व १०० आजी वास्तव्यास आहे.

    माहेरचे हे काम ६८ सेंटर च्या माध्यमातून महाराष्ट्रात ७ जिल्ह्यांमध्ये व महाराष्ट्र बाहेर ७ राज्यांमध्ये संस्थापक संचालिका सिस्टर लुसी कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते. माहेर संस्थेच्या माध्यमातून बचत गटांना सक्षम करण्याचे काम देखील केले. जाते.यावेळी डॉ.सुनीता पोटे यांनी महिलांना विविध आरोग्य विषयक सूचना केल्या तसेच स्वतःच्या आरोग्यावर,स्वतःवर कसे प्रेम करावे हे देखील यावेळी सांगितले.

   पर्यावरणात देखील प्रचंड काम असून नैसर्गिक पर्यावरण दूषित होत चालले असल्याचे मा.सरपंच जिजाताई दुर्गे यांनी सांगितले.महिलाच नैसर्गिक पर्यावरण प्रदूषणमुक्त करू शकतात असा आत्मविश्वास देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!