रांजणगाव गणपती राजमुद्रा चौकात कंटेनर घुसला व्यापारी गाळ्यांमध्ये तीन जण जखमी

9 Star News
0
शिरुर प्रतिनिधी 
अहिल्यानगरहुन पुण्याकडे जाणाऱ्या बेफान कंटेनरने रांजणगाव गणपती येथील राजमुद्रा चौकात पहाटे च्या सुमारास रस्त्यालगत असलेल्या बँनरच्या सांगाड्याला जोरदार धडक दिली तसेच शेजारी असलेल्या अनेक दुकानांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले , यात तीन जण जखमी झाले. माञ सुदैवाने कुठली ही जिवितहानी झाली नाही.  
          या बाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक १३ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगरहुन पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनर क्रमांक एम एच १४ जी.यु.७३५० हे  
 रांजणगाव गणपती हद्दीतील राजमुद्रा चौकात नगर ते पुणे महामार्गालगत च्या होल्डींग धडकून पुढील दुकानांमध्ये घुसले यात तीन जण जखमी झाले . सुदैवाने कुठली ही जिवीतहानी झाली नाही. या मध्ये वाहनचालक याने दारु पिउन गाडी चालवत होता 
. या बाबत अक्षय कर्ण शेळके वय २८ वर्ष राहणार शेळके वस्ती रांजणगाव गणपती तालुका शिरूर जिल्हा पुणे याने फिर्याद दिली आहे. अहिल्यानगरहून पुण्याकडे दारू पिऊन मध्य धुंद अवस्थेत भरधाव वेगात वाहन चालवीत असताना राजमुद्रा चौकातील होर्डिंगला धडक देऊन पुढे असलेल्या गाळ्यांमध्ये घुसून गळ्यातील दुकानातील मालमत्तेचे तसेच गाळासमोर असलेले दुचाकी गाड्यांचे नुकसान केले. 
या अपघातात जगदीश फवारा देवासी राहणार राजमुद्रा चौक रांजणगाव गणपती , कुमारी प्रतीक्षा बाळासाहेब राठोड वय दहा वर्ष, कुशावर्ता बाळासाहेब राठोड दोन्ही राहणार रांजणगाव गणपती हे जखमी झाले असुन आरोपी वाहन चालक गोकुळ बबन शिंदे राहणार तालुका शिरूर कासार जिल्हा बीड याच्यावर मोटर कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पुढील तपास पोलीस निरिक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष पवार हे करत आहेत.
फोटो राजमुद्रा चौकात दुकानात घुसलेला कंटेनर
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!