शिरुर दिनांक (प्रतिनिधी)
शिरुर शहरातील मुद्रांक विक्रेते सुहास घेमूड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित बुध्दिबळ स्पर्धेत १२ वर्ष वयोगटात तन्मय पाटील यांचा तर १५ वर्ष खालील वयोगटात किरण इमाडे प्रथम क्रमांक पटकावला आहे..
सुहास घेमुड स्मृति चषक बुध्दीबळ स्पर्धा - २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. १२ वर्ष व १५ वर्ष वयोगट अश्या दोन वयोगटात या स्पर्धा झाल्या .
यात १२ वर्ष वयोगटाचा स्पर्धेत यांचा तर १५ वर्ष खालील वयोगटात यांच्या प्रथम क्रमांक आला . शिरुर शहरातील मुद्रांक विक्रेते सुहास घेमूड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हॉटेल आशिर्वाद व गणेश भेळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या.
या स्पर्धेत ७५ हून आधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला .
यात १२ वर्षाखालील वयोगटातील विजेते प्रथम क्रमांक -तन्मय पाटील , द्वितीय क्रमांक - अरहन कणसे , तृतीय क्रमांक- अरव संचेती उत्तेजनार्थ - खुशाल मिडगुले , निखीलेश राजूरकर ,ओम पराधी
१५ वर्षा खालील वयोगट विजेते पुढीप्रमाणे
प्रथम क्रमांक- किरण इमाडे , द्वितीय क्रमांक-सुशांत यादव ,तृतीय क्रमांक - मितेश सटाले
उत्तेजनार्थ - स्वराज्य जगदाळे , शाहुराज फाटे ,श्रेयस कर्डिले स्पर्धेचे
स्पर्धेचे पंच म्हणून रोहित आडकर , देवेंद्र ढोकले यांनी काम केले .
स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्योजक अमोल घेमुड यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी सरपंच बाळासाहेब सोनवणे , मुद्रांक विक्रेते आबासाहेब जगताप , बुध्दीबळ प्रशिक्षक राजेश शेजवळ , विजय चोरडिया .आदी उपस्थित होते .
यावेळी अमोल घेमूड म्हणाले की ग्रामीण भागात बुध्दीबळाचा प्रचार व प्रसार व्हावा व खेळाडूना प्रोत्साहन मिळावे याकरिता शिरुर शहरात यापुढे बुध्दीबळ स्पर्धेचे नियमित आयोजन करणार आहे.