शिरूर शहरातील सुशीला पार्क येथील ड्रीम हाईट इमारतीतील प्लॅटला आग आठ लाखाचे नुकसान

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
            शिरूर येथील सुशीला पार्क ड्रीम हाईट येथील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून ८ लाख रुपयांचे नुकसान झाले असून शिरूर नगरपरिषद अग्निशमन दलाच्या वतीने आग आटोक्यात आणली.
       शिरूर येथील तुषार लालचंद अडसूळ यांच्या मालकीची ड्रिम हाइट इमारत सुशिला पार्क येथे असून, काल सर्व कुटुंब देवदर्शनासाठी तुळजापूरला गेले होते काल सायंकाळी अचानक त्यांच्या त्यांच्या फ्लॅट मधून धूर येऊ लागला नागरिकांनी शिरूर नगरपरिषद अग्निशमन दलास माहिती दीली त्यानंतर आग मोठया प्रमाणात पसरली होती. आगीची लोड व धूर उंच आकाशात उडाला होता .
नगरपरिषद अग्निशमन बंब याने आग आटोक्यात आणली तोपर्यंत घरातील फर्निचर या आगीत भस्मसात झाले होते. आगीत ८ लाखो रुपायाचे नुकसान झाले असल्याचे मालक तुषार अडसुळ यांनी सांगीतले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!