पालकांनो सावधान....शिरूर शहर व तालुक्यात अल्पवयीन मुले वाहन चालवताना दिसल्यास पालकांवर गुन्हे दाखल होणार

9 Star News
0

शिरुर दिनांक (प्रतिनिधी) 
शिरूर शहरात शाळा कॉलेज खाजगी क्लासेस या ठिकाणी दुचाकीवरून येणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांनो सावधान अशी मुले आढळल्यास पालकांवर गुन्हा दाखल करण्यात असल्याचा इशारा शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी दिला आहे. 
पालकांनो सावधान ...अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.
    यामुळे शिरूर पोलीस आता रोड रोमिओ, अल्पवयीन ड्रायव्हिंग, ड्रंक अँड ड्राइविंग या संदर्भात ॲक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र दिसून येत आहे.
      शिरूर शहरात पार्किंगची मोठी अडचण असून ती सोडवण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने सम व विषम पार्किंग राबविण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे व शिरूर नगरपरिषद यांच्याशी पार्किंग संदर्भात चर्चा करणार आहे असे गुंजवटे यांनी सांगून शिरूर शहरातील विद्याधाम प्रशाला शाळा सिटीबोरा कॉलेज या परिसरात मोठ्या प्रमाणात शाळा भरण्या अगोदर व सुटणे दरम्यान मोठी वाहतूक कोंडी होत आहे त्यासाठी या शाळांनी स्वतंत्र गार्ड नेमण्याची गरज आहे या शाळांनी व कॉलेज यांनी या परिसरातील गर्दी व वाहने कमी येण्यासाठी स्वतंत्र गार्ड नेमावा यासाठी शाळांना पत्र देणार असल्याचे सांगून, तसेच शहरातून शालेय विद्यार्थ्यांचे वाहातुक करणारे बसेस व इतर वाहने सुस्थितीत आहेत का नाही याची तपासणी करणार आहे. 
       शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ड्रंक आणि ड्राईव्ह संदर्भात गुन्हे दाखल करणे सुरू असून अशा प्रकारे दारू पिऊन वाहने चालवणाऱ्या वाहन चालकावर कडक कारवाई करण्याचे काम सुरू असून शालेय परिसरात शाळा सुटण्या अगोदर व भरण्याअगोदर होणाऱ्या रोडोमियांच्या त्रासातून विद्यार्थिनी महीला यांना मुक्त करण्यासाठी निर्भया पथक गस्त घालणार असल्याची गुंजवटे यांनी सांगितले.
शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे गुटखा विक्री यावर कडक कारवाई करण्यात येईल तसेच
अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात त्याठिकाणच्या अपघातांच्या कारणांचा अभ्यास करुन अपघात होवू नये म्हणून उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत घेऊन उपाययोजनाचा भाग म्हणून स्पीड ब्रेकर ही रस्त्यावर टाकण्यात येणार असल्याचे गुंजवटे म्हणाले शहरातील विविध कॅफे मधून चूकीचे काही होणार नाही या दृष्टीने कारवाई करण्यात येईल . पोलिसिंग व्यवस्थित करुन लोकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे गुंजवटे म्हणाले .





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!