आपल्याकडील विविध कलागुणांचा उपयोग आपल्यातील इतर महिलांना होण्यासाठी महिलांनी याबाबत मोफत महिलांना प्रशिक्षण देऊन महिलांना सक्षम करूयात असा वेगळा उपक्रमाचा संकल्प वट पौर्णिमा दिवशी शिरूर येथील महिलांनी करून नवीन आदर्श निर्माण केला आहे.
अक्षर मानव आधुनिक सावित्रीच्या लेकी उपक्रम खारामळा येथील महिलांनी वट पौर्णिमा दिवशी सुरु केला.
जिच्या कडे जे काही कला गुण असतील ते तिने आपल्या भागातील इतर महिला व. मुलींना मोफत द्यायचे . असे प्रत्येकीने द्यायचे त्यासाठी प्रत्येक रविवारी सर्वांनी वडाच्या झाडाखाली जमायचे आणि आपले ज्ञान कौशल्य इतर महिलांना द्यायचे. कोणी पाक कला देईल, कोणी संगीत शिकवेल, कोणी रांगोळी, कोणी मेहंदी काढणे तर. कोणी आपल्या भागातील लहान मुलांना झाडाखाली जमवून वैज्ञानिक थोर संत महात्मे यांच्या गोष्टी सांगतील कोणी योगा शिकवतील . अनेक उपक्रम महिलांनी मिळून करूयात असे राही प्रतिष्ठान च्या डॉ. सुनिताताई पोटे यांनी सर्व महिलांच्या वतीने जाहीर करून एक आगळी वेगळी वटपौर्णिमा साजरी करून समजपुढे नवीन आदर्श घालून दिला गावोगावी असे उपक्रम सुरु करावेत असे महिलांना आवाहन केले.
यावेळी राही प्रतिष्ठानच्या वतीने वट पूजेसाठी आलेल्या महिलांना थंड पाणी व चहाची व्यवस्था करण्यात आली होती.