मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आज उपचारानंतर आपल्या आंतरवाली सराटी गावात दाखल झाल्यानंतर शिरूर शहर पंचक्रोशी व तालुक्याच्या वतीने आज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यात आला.
शिरूर येथील तर्डोबावाडी चे सरपंच संभाजी कर्डिले, सामाजिक कार्यकर्ते रमेश दसगुडे रुपेश घाडगे संपत दसगुडे, यांनी हा पाठिंबा जाहीर केला.
मराठा आरक्षणासाठी गेली अनेक महिन्यापासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले काही दिवसापूर्वी त्यांचे उपोषण स्थगित करण्यात आले त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेऊन पुन्हा आपल्या आंतरवाली सराटी या गावात दाखल झाले.
यावेळी तर्डोबावाडीचे सरपंच संभाजी कर्डिले यांनी शिरूर शहर व पंचक्रोशी शिरूर तालुका यांच्यावतीने मराठा योद्धा मनोज दरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. व शिरूर तालुक्यातील सकल मराठा समाज यांचा पाठिंबा असल्याचेही जाहीर केले. यावेळी त्यांच्या समवेत शिरूर शहर व पंचक्रोशीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.