शिरूर रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपनीत क्रेनचा हुक तुटल्याने पार्ट अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

9 Star News
0
शिरूर दिनांक ( प्रतिनिधी ) 
रांजणगाव औद्योगिक वसाहत ता. शिरुर येथील झामील स्टील कंपनीमध्ये क्रेनच्या सहाय्याने मोठमोठे पार्ट उचलत असताना क्रेनचे हुक तुटून पार्ट अंगावर पडल्याचे कंपनी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
        या घटनेत शिवबाबू कमलेश शाहू (वय २३ वर्षे सध्या रा. ढोकसांगवी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. मनकापूर पोस्ट कुमिवाहा ता. मन्झहनपूर जि. कौसंबी उत्तरप्रदेश) याचा मृत्यू झाला असून, याबाबत राजेश बुधानी शाहू (वय ३४ वर्षे रा. ढोकसांगवी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. मनकापूर पोस्ट कुमिवाहा ता. मन्झहनपूर जि. कौसंबी उत्तरप्रदेश) यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे.
                            रांजणगाव औद्योगिक वसाहत ता. शिरुर येथील झामील स्टील कंपनीमध्ये शिवबाबू शाहू हा क्रेनच्या सहाय्याने लोखंडी पार्ट उचलत असताना अचानक क्रेनचे हुक तुटून लोखंडी वजनदार पार्ट शिवबाबूच्या छातीवर पडून त्यावेळी शिवबाबू पाठीमागे असलेल्या पार्ट मध्ये अडकला गेला, दरम्यान अन्य कामगारांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवले मात्र उपचारा पूर्वीच शिवबाबूचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले, पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे हे करत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!