शिरूर तालुक्यातील दहिवडीत वनविभागाकडून परिसरात रात्रंदिवस पहारा

9 Star News
0
दहिवडीत वनविभागाकडून परिसरात रात्रंदिवस पहारा
शिरूर 
( प्रतिनिधी ) दहिवडी ता. शिरुर येथे २१ जून रोजी यश गायकवाड या दहा वर्षीय बालकाचा संशयित मृत्यू झाल्याची घटना घडलेली असताना बिबट्याच्या हल्ल्यात यशचा मृत्यू झाल्याचे बोलले जात असून मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नसताना देखील वनविभागाकडून परिसरात रात्रंदिवस पहारा देत जनजागृती करण्यात येत आहे.
                       दहिवडी ता. शिरुर येथील मांजरे वस्ती येथे २१ जून रोजी यश सुरेश गायकवाड या बालकाचा मृतदेह शेतात आढळून आला मात्र बिबट्याचा हल्ल्यात यशचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात असताना वनविभागाला येथे बिबट्याबाबत काही निदर्शनास आले नाही मात्र परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाने येथे पाच पिंजरे लावत बिबट्याला जेरबंद करण्याच्या उपाययोजना सुरु करत शिरुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गौरी हिंगणे व गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक प्रमोद पाटील, बबन दहातोंडे, विशाल चव्हाण, संतोष भुतेकर, नारायण राठोड, चालक अभिजित सातपुते तसेच शिरुर वनविभाग रेस्क्यू टीमचे हनुमंत कारकुड, नवनाथ गांधीले, शेरखान शेख, अमोल कुसाळकर, जयेश टेमकर, अविनाश सोनवणे, शुभम वाघ, रोहित येवले, शुभम शिस्तार, सुदर्शन खराडे, श्रेयस उचाळे, ऋषिकेश विधाटे, शरद रासकर यांच्या माध्यमातून परिसरात चोवीस तास पहारा सुरु ठेवला असून परीसरात बिबट जनजागृती करण्यात येत आहे. तर दहिवडीचे पोलीस पाटील जालिंदर पवार, गोरक्ष काळे यांसह आदी युवक देखील वनविभागाला सहकार्य करत रात्रगस्त मध्ये सहभागी होत आहे.
स्वतंत्र चौकट १ –
बालकाच्या मृत्यूचे गूढ उलगडणार कधी . . . . . . .
दहिवडी येथे यश गायकवाड या बालकाचा मृतदेह आढळून आला मात्र बिबट्याच्या हल्ल्याबाबत काही ठोस पुरावे मिळाले नसल्याने शवविच्छेदन अहवाल व जखमेवरील रक्त्याचे नमुने अहवाल प्राप्तीनंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असून बालकाच्या मृत्यूचे गूढ उलगडणार कधी याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
फोटो खालील ओळ – दहिवडी ता. शिरुर येथे वनविभागाकडून रात्रंदिवस सुरु असलेला पहारा.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!