शिरूर येथील नवीन मार्केट यार्ड येथे वाहन कर्जाच्या वादातून एकाला मारहाण

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
         शिरूर येथील नवीन मार्केट यार्ड घावटे कॉम्प्लेक्स येथे वाहन कर्जाचा झालेल्या व्यवहाराचा राग मनात धरून एकाला लोखंडी रॉडने हाताने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          दत्तात्रेय वसंत लंके (वय 35 वर्ष धंदा:- नोकरी रा. शिरूर ता.शिरूर जिल्हा पुणे मूळ रा. निघोज ता.पारनेर जि) यांनी फिर्याद दिली आहे.
         किसन जयवंत नरवडे (रा. कुरूंद ता. पारनेर जि. अहमदनगर.) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
             याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक १३ जून रोजी दुपारी १:१५ वाजता सुमारास . शिरूर येथील नवीन कांदा मार्केट येथील घावटे कॉम्पलेक्स मधील जिन्या मध्ये किसन जयवंत नरवडे याने त्याचे वाहन कर्जाचा पायल सर्व्हिस सेन्टर सोबत झालेल्या व्यवहाराचा राग मनात धरून फिर्यादी दत्तात्रेय लंके याला लोखंडी रॉड व हाताने मारहाण करून, शिवीगाळ करून डाव्या हाताच्या करंगळीस गंभीर दुखापत केली आहे. याबाबत फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अनिल आगलावे करत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!