शिरूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती

9 Star News
0
शिरूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती
शिरूर 
( प्रतिनिधी ) शिरुर ता. शिरुर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप प्रमोद यादव यांची नुकतीच सेवा कार्यकाळानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाहून पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.
                  शिरुर ता. शिरुर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप प्रमोद यादव यांनी २०१० साली पोलीस उपनिरीक्षक पदापासून गडचिरोली भागातून त्यांच्या नोकरीला सुरुवात केली, दरम्यान त्यांना शासनाच्या वतीने खडतर सेवा पदक देऊन गौरविण्यात आले तर २०१४ साली त्यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाली होती, यापूर्वी त्यांनी गडचिरोली, पुणे शहर तसेच पुणे ग्रामीण मध्ये सेवा बजावली असून त्यांच्या सेवा काळामध्ये त्यांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करत आरोपींना जेरबंद केले आहे, नुकतेच शिक्रापूर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप यादव यांची पोलीस निरीक्षक पदावर बढती झाल्याने शिरुर तालुक्यातून पोलीस निरीक्षक संदीप यादव यांचे कौतुक होत आहे. शिरूर आमदार अशोक पवार, माजी नगराध्यक्ष उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल, शिरूर  पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!