शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती

9 Star News
0
शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन येथे सतीश पवार यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती
शिरूर 
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश मारुती पवार यांची नुकतीच सेवा कार्यकाळानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाहून पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.
                  शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश मारुती पवार यांनी २०१० साली पोलीस उपनिरीक्षक पदातून त्यांच्या नोकरीला सुरुवात केली असताना २०१४ साली त्यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाली होती, यापूर्वी त्यांनी सातारा पुणे शहर तसेच पुणे ग्रामीण मध्ये सेवा बजावली आहे, तर त्यांच्या सेवा काळामध्ये त्यांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करत आरोपींना जेरबंद केले आहे, नुकतेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांची पोलीस निरीक्षक पदावर बढती झाल्याने शिक्रापूर सह परिसरातून पोलीस निरीक्षक सतीश पवार यांचे कौतुक होत आहे.
सोबत – सतीश पवार यांचा फोटो.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!