रांजणगाव गणपती ता . शिरूर भांबार्डे रस्त्यावरील पुणे 'अथर्व ज्वेलर्स' या सोन्याच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करून लॉकर तोडून अज्ञात चोरट्यांनी चांदी, सोने दागिनेचा असा एकूण अंदाजे १६ लाख २५ हजारांचा ऐवज चोरुन नेला असल्याची माहिती रांजणगाव गणपती पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.
याबाबत दुकानाचे मालक श्रीहरी निवृत्ती खोल्लम(रा . प्रितम प्रकाश नगर शिरूर तालुका शिरूर, जि.पुणे)यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत रांजणगाव पोलिस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत रांजणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक १२जून रोजी पहाटेच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला असुन श्रीहरी निवृत्ती खोल्लम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १२ जुन रोजी सकाळी ६ वाजता दुकानाच्या वरील मजल्यावर राहणाऱ्या हर्षल प्रविण पाटील यांनी तुमच्या दुकानाचे लोखंडी ग्रील व शटर तुटले असुन चोरी झाली असल्याचा संशय व्यक्त केल्याने दुकानावरती जाऊन पाहिले असता दुकानात चोरी झाल्याचे दिसुन आले.त्यांनी दुकानात खातरजमा केली असता, लॉकर्स तोडून चोरट्यांनी चांदी व सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडले होते
त्यामुळे तातडीने पोलीसांना कळवताच शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलिस निरीक्षक बजरंग झेंडे, पोलिस उपनिरीक्षक निळंकंठ तिडके, पोलिस हवालदार संतोष औटी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळी पाहणी करुन अज्ञात चोरट्या विरुद्ध १६ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात व्यक्तींनी चोरी केल्याबद्दल रांजणगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसारे हे करीत आहेत.