शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर शहरातील इंदिरा गांधी पुतळा चौक या परिसरात गावठी पिस्टल (रिव्हॉल्व्हर) दाखवत दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला शिरूर पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा ३० हजार दोनशे रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
वैभव नितीन भोईनल्नु (वय २४वर्षे रा. कामाठीपुरा शिरूर ता. शिरूर जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चे नाव आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल नितेश थोरात यांनी फिर्याद दिली आहे
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक २१ जून रोजी सायंकाळ दरम्यान शिरूर शहर इंदिरा गांधी पुतळाचौक परीसरात वैभव नितीन भोईनल्नु (वय २४वर्षे रा. कामाठीपुरा शिरूर ता. शिरूर जि. पुणे)पिस्टल हातात घेवुन इंदिरागांधी पुतळा चौक शिरूर परीसरात मोठमोठ्याने शिवीगाळ करून लोंकामध्ये दहशत निर्माण करत असताना याबाबत माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांना कळाली त्यांनी तातडीने पोलिस उपनिरिक्षक अभिजित पवार व पोलीस पथक या परिसरात पाठवले त्यांनी दहशत निर्माण करणारा वैभव भोईंनलु याला शोधून ताब्यात घेऊन त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्टल (रिव्हॉल्व्हर )व दोन जिवंत काडतुस असा एकुण ३०हजार दोनशे रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.
वैभव नितीन भोईनलु याचेविरूध्द शिरूर पोलिस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3 (25) किमिनल. लॉ. ऍक्ट चे कलम 3,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक अभिजित पवार हे करीत आहे.