आमदार साहेब... समन्वय बैठकीचे नाटक बंद करा...२० हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबाला रोजी रोटी देणारा घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला कसा आणि तो यावर्षी सुरु करणार की नाही यावर बोला असे आव्हान भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेशा उपध्यक्ष संजय पाचंगे यांनी केले आहे.
दिनांक - २० जुन २०२४ रोजी शिरुर - हवेली चे आमदार आशोक पवार यांनी सर्व अधिकार्यांची समन्वय बैठक आयोजित केली होती.
घोडगंगा सहकारी साखर कारखाना लुटुन आपला खाजगी कारखाना उभा केला आणि गेल्या वर्षी घोडगंगा ३५ कोटी रुपयांचे कर्ज मिळुनही गाळप परवान्यासाठी फक्त १८ लाख रुपये भरण्याचे टाळुन कारखाना गाळप होऊनच दिले नाही.३५ कोटी रुपये हडपच केले.?
२० हजार शेतकऱ्यांच्या व्यथा तुम्हाला दिसत नाही, शेकडो कारखाना कर्मचार्यांच्या व्यथा तुम्हाला दिसत नाही, पाच वर्षांत एकदाही आमसभा घेतली नाही आणि आता विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून समन्वय बैठकीचे नाटक सुरू केले ते बंद करा.
गेल्या वर्षी चे ३५ कोटी रुपये कुठे गेले ते सांगा? त्यांनंतर राज्य सरकारने हमी दिल्यानंतर किती कर्ज उचलले ते सांगा आणि चालु वर्षि घोडगंगा कारखाना सुरू होणार की नाही हे सांगा असा सवाल पाचंगे यांनी करून कामगारांची देणी दिल्याशिवाय कारखाना सुरू करता येणार नाही. मग कामगारांची थकीत देणी कधी देणार हे सांगावे असे आव्हान भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय शिवाजी पाचंगे यांनी केले.