शिक्रापुरात जिजाऊंच्या पालखीचे जल्लोषात स्वागतजिजाऊंचे जन्मस्थळ ते समाधीस्थळ पालखी सोहळा संपन्न

9 Star News
0
शिक्रापुरात जिजाऊंच्या पालखीचे जल्लोषात स्वागत
जिजाऊंचे जन्मस्थळ ते समाधीस्थळ पालखी सोहळा संपन्न 
शिरूर 
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथे राजमाता जिजाऊ यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन होताच पालखिचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले असून यावेळी सदर पालखी सोहळ्याचे स्वरूप पुढील काळात नक्कीच व्यापक होईल असा आशावाद सरपंच रमेश गडदे यांनी व्यक्त केला आहे. 
                       शिक्रापूर ता. शिरुर येथे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथून आलेल्या राजमाता जिजाऊ पालखीचे आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले, यावेळी सरपंच रमेश गडदे, उपसरपंच सारिका सासवडे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, मोहिनी मांढरे, मंगल सासवडे, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र मांढरे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. सदर पालखी सोहळ्याचे तिसरे वर्ष असून यामध्ये अनेक युवक, युवती व महिला सहभागी होऊन राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेड राजा ते समाधीस्थळ पाचड असा परवास करतात या पालखी सोहळ्यामध्ये लखोजी राजे जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव, शरद दरेकर पाटील, उद्योजक विशाल पाबळे, नंदा भुजबळ, अलका जोगदंड, रोहीनी दरेकर, किरण ढमढेरे, वैभव ढमढेरे, शिवाजी घोडे, राहुल पाबळे, निलेश गुंड,  अनिकेत पाबळे, सचिन शिंदे, माऊली पाबळे, सुमंत शेळके यांसह आदी शिवभक्त सहभागी झाले होते, तर या पालखीचे शिक्रापुरात स्वागत प्रसंगी बोलताना पालखी सोहळा हा राजमाता जिजाऊंचा जीवन गौरव उलगडणारा असून गावागावामध्ये पालखी सोहळ्याचे होत असलेले स्वागत कौतुकास्पद असल्याचे लखोजी राजे जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव यांनी सांगितले.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथे राजमाता जिजाऊंच्या पाळीचे स्वागत करताना पदाधिकारी .
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!