यशस्वीविनी वेल फेअर फॉउंडेशन प्रहार दिव्यांग संस्था यांच्या वतीने बुद्ध विकास महासंघ यांना वट पौर्णिमा निमित्त वृक्ष वाटप करून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.
ओम शांतीच्या शकुंतला दीदी वासंती बहेन याच्या हस्ते वृक्ष वाटप करण्यात आले.
उपक्रम करण्यामागे एक उद्देश आहे भविष्यात तापमान वाढत आहे. तापमान कमी करण्यासाठी एकच उपाय आहे झाडे लावा झाडे जगवा त्यामुळे सर्व सामाजिक संस्था यांनी सुद्धा हा उपक्रम राबवावा असे आवाहन ओम शांतीच्या शकुंतला दीदी यांनी केले .
तसेच यशश्विनी सामाजिक संस्थाच्या सचिव नम्रता गवारे यांनी सुद्धा तालुक्यातील शाळांना आव्हान विनंती केली आहे एक विदयाधार्थी एक झाड हा उपक्रम राबवावा.
यावेळी बौद्ध विकास संघाचे सदस्य आनंद नितनवरे, सोनवणे डोळस दादा रेनुका मल्लाव उपस्थित होते.प्रहार संस्थेचे शिरूर शहर अध्यक्ष मनीष सोनवणे यांनी आभार मानले.