शिक्रापूर ता. शिरुर येथील एका युवकासह त्याच्या नातेवाईकांचे उसने घेतलेले पैसे परत न दिल्याचा राग व सोन्याची चोरी केल्याचा आळ घेत कार मधून हातपाय बांधून अपहरण करुन त्यांना खेड तालुक्यात नेऊन हातपाय बांधून, उलटे टांगून काठी कोयता व तलवारीने अमानुषपणे मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी मध्ये एका महिलेचा समावेश आहे.
मारहाणीत सत्यसिंग चंदरसिंग कर्मावत, स्वप्नाली सत्यसिंग कर्मावत (दोघे रा. कान्हूर मेसाई ता. शिरुर जि. पुणे), दूरबाल बिरावत (रा. कासारी फाटा ता. शिरुर जि. पुणे), शिवभगत राजकुमार बिरावत (रा. बजरंगवाडी ता. शिरुर जि. पुणे रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे )हे जखमी झाले आहेत.
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे उत्तरसिंग मनावत ( राठोड ), विकी मनावत ( राठोड ), अजय मनावत ( राठोड ), सचिन मनावत ( राठोड ) यांसह पंधरा अनोळखी युवकांवर (सर्व रा. काळूस ता. खेड, जि.पुणे)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सत्यसिंग चंदरसिंग कर्मावत (वय ३० वर्षे रा. कान्हुर मेसाई ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे शिक्रापूर ता. शिरुर येथील शिवभगत बिरावत याचा नातेवाईक असलेल्या सत्यसिंग याने काळूस येथील उतरसिंग मनावत याच्याकडून काही पैसे उसने घेतले होते मात्र ते पैसे दिले नसल्याने उतरसिंग चिडून होता, त्यामुळे २३ जून रोजी रात्री उतरसिंग हा त्याच्या पत्नीसमवेत सत्यासिंगच्या घरी आला आणि सत्यसिंग सह त्याच्या पत्नीला बळजबरीने कारमध्ये बसवून कालू येथे घेऊन जाऊन त्यांना डांबून ठेवून तुम्ही आमचे सोने चोरी केले आहे ते आम्हाला आणून द्या असे म्हणून लाकडी काठी, तलवार कोयते हातात घेऊन बेदम मारहाण केली त्यांनतर काही साथीदारांना सोबत घेऊन तीन कारसह सत्यसिंगला पुन्हा गाडीमध्ये बसवून आम्हाला दूरबाल बिरावत व शिवभगत बिरावत यांचे घर दाखवा असून म्हणून शिक्रापूर येथे आणून दूरबाल व शिवभगत या दोघांच्या घरी जाऊन दोघांना देखील हातपाय बांधून बळजबरीने कारमध्ये बसवून त्यांना मारहाण करत काळूस येथे घेऊन जाऊन वेगवेगळ्या खोलीमध्ये डांबून ठेवून हातपाय बांधून आम्हाला पैसे नको सोने द्या असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करुन काहींचे हातपाय बांधून उलटे टांगून पंधरा ते वीस जणांनी लाकडी दांडके, कोयते, लोखंडी गज तसेच पाईपने बेदम व अमानुषपणे मारहाण केली तर मारहाण करताना त्याबाबतचे व्हीडीओ चित्रीकरण करुन घेऊन दुसऱ्या दिवशी सोशल मिडीयावर प्रसारित केले, तर दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास सत्यसिंगचा मोठा भाऊ भीमा बिरावत तेथे आल्यानंतर त्याने तू माझ्या भावाला सोड त्याने चोरी केली असेल तर मी माझा बंगला तुला लिहून देतो असे म्हनला असता उतरसिंग याने कागदावर काहीतरी लिहून घेतले त्यांनतर उतरसिंग याने सर्वांना सोडून दिले, यातील अपहरण केलेल्या सर्वांना लाकडी काठी कोयता तलवारे यांनी पूर्ण शरीरावर अमानुष मारहाण केल्याने अंगावर काळे निळे वन व जखमा झाले आहेत.
फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करत आहे.